Monday, July 26, 2010

तू तिथे मी.....

तू दिवस मी रात
तू समई मी वात

तू नदी मी नाला
तू वेली मी पाला

तू फुल मी काटा
तू झाड मी फाटा

तू बदाम मी काजू
तू नागर मी जू

तू गाय मी रेड्या
तू जेल मी बेड्या

तू पाऊउस मी वारा
तू धबधबा मी झरा

तू डोंगर मी दरी
तू ढग मी सरी

तू दुध मी साय
तू गुढघा मी पाय

तू झोप मी स्वप्न
तू लोणी मी कृष्ण

तू सवाल मी जबाब
तू हड्डी मी कबाब

तू कापूस मी सुत
तू समाचार मी दूत

तू आग मी वणवा
तू दिवा मी काजवा

तू घन्टा मी नाद
तू चव मी स्वाद

तू सूर्य मी किरण
तू जंगल मी कुरण

तू देव मी देव्हारा
तू पिचकारी मी फवारा

तू चंद्र मी रवी

तूच माझी कविता मी तुझा कवी .................
--कांबळे परमेश्वर



नोट : कविता माझ्या परवानगीने कोणीहि , कुठेहि पब्लिश आणि पब्लिक करू शकतो .