Sunday, November 23, 2008

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...


राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...

तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...

तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...

मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...

आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ..
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..

राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...

शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..

राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...

राजे बार झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..
तुमच्या नावासाठी लढताना

Thursday, November 13, 2008

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

========================

Sunday, June 29, 2008

श्याम राजेंचा छत्रपति संभाजी महाराजाना एक मानाचा मुजरा ....................




सम्भाजी महाराजांचा इतिहास काही जनानी हेतुपर वाईट रंगवला आहे , हे इतिहासाला
आता पुरत उमगल आहे.

मी कविता लिहिन तसा थाम्बवाला होत , पण त्यांच्या जीवन सम्बंधिच्या वाचनातून आज लिहावासा वाटला आणि आज जवळपास २ वर्षा नंतर लिहायला घेतला ,
जे काही मला कळाले त्याला मी माज्या शब्दात गुफन्याचा प्रयत्न केला उन ..तयार जाली ही कविता....

==================================================================

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!

बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!


डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!

Written By Shyam Wadhekar
Date 29 Jun 08 ,11.40 AM

Wednesday, May 14, 2008

ते सारे क्षण . . .


ते सारे क्षण . . .

ते क्षण . . .
तुझ्या हसण्याचे ,
तुझ्या रूसण्याचे ,
मला चोरून भेटण्याचे . . .

ते क्षण . . .
आपल्या गप्पांचे ,
हातात हात घालून ,
गावभर हीडायाचे . . .

ते क्षण . . .
तुझी वाट पाहण्याचे ,
खोट्या खोट्या भांडनाचे ,
भांडण विसरून पुन्हा हसण्याचे . . .

ते सारे क्षण . . .
आपल्या प्रेमाचे . . .
माझ्या मनाच्या पायवाटेवर ,
आपल्या पाउलखुणा सोडून गेले आहेत . . .
अगदी कायमच्या . . .

त्यानंतर कितीतरी पावसाळे उलटून गेले ,
तरी त्या पाउलखुणा तश्याच आहेत . . .
अगदी तुझ्या आठवणींसारख्या . .

Friday, May 2, 2008

तिला कळतच नाही


तिला कळतच नाही
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.

Sunday, April 20, 2008

नेहमीच कसं हसवायचं...??

नेहमीच कसं हसवायचं...??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं...
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...??

समोरचा तो हसला................नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर...
हसवणाराच् मी कसला...

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं...
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण .... श्वास जड होतो जेव्हा---...तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...!!!

मी रडू लागलो जेव्हा ...
ते मात्र हसत होते...
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते...

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत.......स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ........ह्रूदयातच ढग दाटून येतो....तेव्हा रे काय करायचं....???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं.

Thursday, March 13, 2008

रे मना

रे मना....मृगजळावरी, तु भाळतो कशाला..?
हे गंध भासधुंद, तु माळतो कशाला...?

हे शब्द आपल्यांचे की खेळ सावल्यांचे?
जुने प्रश्न हे उन्हाचे, तु टाळतो कशाला...?

ती वेदना खरी, जी तुझ्या खोल अंतरी!
खुळे पथ्य यातनांचे, तु पाळतो कशाला...?

हे गीत अंतराचे! तिच्या ओल्या स्वरांचे
ते स्वर असे पुन्हा, तु गाळतो कशाला...?

ही जुनी बात झाली, 'ती स्वप्नात आली'
या नव्या चांदराती, तु जाळतो कशाला...?

क्षण शब्दशः मोती, क्षण आठवेच होती
ही आसवे उगाची, तु ढाळतो कशाला...?

Thursday, January 10, 2008

Baliraja ....


शाळेत शिकलो होतो
भारत कृषी प्रधान देश आहे म्हणून
पण तेव्हा देत नव्हते
कुणी शेतकरी जीव
आताही तेच ऐकतोय
भारत कृषी प्रधान देश आहे
पण आता इथं
शेतकरी संपवतात
आपलं जीवन...
त्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या
तुम्ही वाचता आणि
फक्त हळहळता...
कुणी म्हणतं त्यांना
शेतीच करता येत नाही
पण
पोट कसं भरतयं तुमचं
हेच विसरतात..
शेतकऱ्यांच्या पिढ्या
खपल्या शेतात
तिथं करता येत नाही
चार पैशांचा भ्रष्टाचार
कुणी देत नाही तिथं
एक-दोन पोते लाच
जमिनीत पेराव लागतं
अन्
पहावं लागतं आभाळाकडं
पाऊस तुमच्यासाठी
असतो वैताग
आमच्यासाठी असतो
जगण्याचं अमृत
आणि काय केलत हो तुम्ही
आमच्यासाठी कधीतरी
दोन तासांचं लोडशेडिंग
तुम्हाला अस्वस्थ करणारं
पण पंधरा-पंधरा दिवस
लाईट नाही
विहिरीत पाणी पण...
पिकं जळतात डोळ्यासमोर...
लोडशेडिंग तुम्हाला गैरसोयीचं
तर आमच्यासाठी जीवघेणं
इथं धरणं झाली पण
कालवे नाहीत
भ्रष्टाचारानीच
"पाटा'ला "बंधारे' घातलेत
कसं पोचलं पाणी...
कशी पिकंल शेती...
तुम्ही तरी कसून दाखवा
बटाईनं घ्या
आमची वावरं
बघू मग तुम्ही
केव्हा देणार जीव ते...

Noce one


मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...