Monday, July 26, 2010

तू तिथे मी.....

तू दिवस मी रात
तू समई मी वात

तू नदी मी नाला
तू वेली मी पाला

तू फुल मी काटा
तू झाड मी फाटा

तू बदाम मी काजू
तू नागर मी जू

तू गाय मी रेड्या
तू जेल मी बेड्या

तू पाऊउस मी वारा
तू धबधबा मी झरा

तू डोंगर मी दरी
तू ढग मी सरी

तू दुध मी साय
तू गुढघा मी पाय

तू झोप मी स्वप्न
तू लोणी मी कृष्ण

तू सवाल मी जबाब
तू हड्डी मी कबाब

तू कापूस मी सुत
तू समाचार मी दूत

तू आग मी वणवा
तू दिवा मी काजवा

तू घन्टा मी नाद
तू चव मी स्वाद

तू सूर्य मी किरण
तू जंगल मी कुरण

तू देव मी देव्हारा
तू पिचकारी मी फवारा

तू चंद्र मी रवी

तूच माझी कविता मी तुझा कवी .................
--कांबळे परमेश्वर



नोट : कविता माझ्या परवानगीने कोणीहि , कुठेहि पब्लिश आणि पब्लिक करू शकतो .

Wednesday, April 28, 2010

तुझाच हात हाती हवा


कानावर बोल पडता तिचे
ती काळजाला स्पर्श करते,
मंद- गोड हसण्याने तिच्या
मग दोघांचेही भान हरवते

शब्दांनीच बोलावं असं काही नसते,
बोलण्यासाठी भावना ती महत्वाची असते !
तिची ती भावना, माझ्या मनाला कळते,
अन माझ्या प्रीतीने तिचे हि मन शहारते !

खळखळून हसणारी, माझी ती हसरी,
स्वप्नात देखील हसताना दिसते ..
तिचे ते हास्य टिकवण्यासाठी,
माझे हि मन मग रात्रं-दिवस एक करते !

हसता हसता कधी डोळे ओले हि होतात
काळजीने एकमेकांच्या
हळूच आसू बाहेर पडतात,
शब्द तिचे बाणासारखे ,
काळजावरती घाव करतात ..
अन जखम करून माझ्या मनाला,
शेवटी स्वतःच त्याचे दुख भोगतात

तिचे ते दुख,
मी नाही बघू शकणार
तिच्या प्रत्येक सुखासाठी
जीवाचा माझ्या रान करणार

सुखाच्या प्रत्येक स्वप्नासाठी
सये .. देशील ना ग साथ ,
साकारण्यासाठी ते प्रत्येक स्वप्न
फ़क़्त हाती हवा तुझाच हात !.. तुझाच हात ..

- अमोल, २८ एप्रिल २००९



Monday, April 26, 2010

वाट मी पाहतो आहे


डोळ्यात तिच्या मी पहिले
अन क्षणात सारे बहरून गेले !
अंतर जरी पडले, तरी
मन मात्र एकमेकात कायमचे गुंतून पडले !

डोळ्यांची भाषा डोळ्यांनाच का कळते
बोल पडले कमी तरी
अंगात प्रेमाची एक लहर सळसळते

कधी कधी बोलतांना
केवळ एक नजर पुरेशी असते
अन बोलायला सुरु केला
तर अक्खी रात्र पण अपुरी पडते

हे असे का होते ?
हे असे का घडते ?
स्वप्न पाहण्या साठी सखे
झोप तरी कुठे ग येते ..

स्वप्नात पहिले जे
प्रत्यक्षात मी अनुभवतो आहे !
तिच्या आठवणींच्या सवे,
फ़क़्त तिच्याच येण्याची वाट मी पाहतो आहे !

वाट मी पाहतो आहे .........
-- अमोल

क्षणात सारे बदलून गेले


क्षणात सारे बदलून गेले,
तिला पहिले अन-मन माझे हरवून गेले.

अशाच एका सायंकाळी
तिची आणि माझी पहिली भेट,
सोबतीला होता केवळ एकांत,
अन नजरेला भिडली नजर थेट.

भिर-भिरणारे मन माझे हे
झाले अगदी निवांत,
कशी असेल ती ? कोण असेल ती ?
ह्या प्रश्नाचे काहूर हि झाले शांत

लागताच चाहूल सुखाची मनाला
नवी पालवी जणू मनात फुटली,
जशी सुखाची भाग्य लक्ष्मी- तिच्या पावली जीवनात आली.


स्वप्न नवे .. नवे हे जीवन
सोबत नवी .. नव- नवी हि आठवण,
आयुष्यात कायम राहो
असेच आमच्या सुखाचे हे सोनेरी क्षण !

- अमोल

Thursday, January 14, 2010

पर्व संक्रांतीचे तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शुभ पर्व आहे हा संक्रान्तिचा
स्नान करा , घ्या संकल्प नवा
तन आणि मन आपण शुद्ध करा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

आता सूर्य आला उत्तर मध्ये
आणि प्रकाश जीवनात तुमच्या
द्या सर्वाना सन्देश आज मैत्रीचा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

भीष्माने त्यागला होता आपला देह
आजच्याच दिवशी, गंगा आली पृथ्वीवर !
असा हा संक्रान्तिचा आहे महिमा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

कुठे आहे लोहड़ी , ते कुठे उत्तरायणी
कुठे पर्व पोंगल्च्या आणि कुठे बिहूचा
माझ्या राष्ट्रामध्ये अनेकते मध्ये एकता
हे पर्व संक्रांतीचे तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
तीळ गुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला !

------- निपुण पाण्डेय "अपूर्ण "

****मी मराठी शिकत आहे ! चूक दिसल्यास क्षमा असावी !
विशेष आभार : श्री अमोल सुरोशे ( मराठी मार्गदर्शन साठी )

केवळ जन्माने अमराठी असला तरी माझ्या या मित्राच्या भावना ह्या अस्सल मराठी आहेत .. धन्यवाद निपुण पाण्डेय