Wednesday, April 28, 2010

तुझाच हात हाती हवा


कानावर बोल पडता तिचे
ती काळजाला स्पर्श करते,
मंद- गोड हसण्याने तिच्या
मग दोघांचेही भान हरवते

शब्दांनीच बोलावं असं काही नसते,
बोलण्यासाठी भावना ती महत्वाची असते !
तिची ती भावना, माझ्या मनाला कळते,
अन माझ्या प्रीतीने तिचे हि मन शहारते !

खळखळून हसणारी, माझी ती हसरी,
स्वप्नात देखील हसताना दिसते ..
तिचे ते हास्य टिकवण्यासाठी,
माझे हि मन मग रात्रं-दिवस एक करते !

हसता हसता कधी डोळे ओले हि होतात
काळजीने एकमेकांच्या
हळूच आसू बाहेर पडतात,
शब्द तिचे बाणासारखे ,
काळजावरती घाव करतात ..
अन जखम करून माझ्या मनाला,
शेवटी स्वतःच त्याचे दुख भोगतात

तिचे ते दुख,
मी नाही बघू शकणार
तिच्या प्रत्येक सुखासाठी
जीवाचा माझ्या रान करणार

सुखाच्या प्रत्येक स्वप्नासाठी
सये .. देशील ना ग साथ ,
साकारण्यासाठी ते प्रत्येक स्वप्न
फ़क़्त हाती हवा तुझाच हात !.. तुझाच हात ..

- अमोल, २८ एप्रिल २००९No comments: