Tuesday, June 28, 2011

क्षण जपून ठेवण्यासाठी

क्षण जपून ठेवण्यासाठी मी कविता लिहिली होती,
पण ती कविताच आता मजला रोज रडवते आहे.

Thursday, June 9, 2011

ती अशीच त्याला भेटली, अगदी अचानक आलेल्या पावसासारखी

खूप पावसाळे गेले. पण अगदी अलीकडे पर्यंत त्याला पाऊस कधीच आवडलेला नव्हता. पाऊस म्हंटल की त्याला भीती वाटायची, नसती कट कट वाटायची. भिजणे तर त्याला कधीच नको वाटायचे, उगाच सर्दी ला आमंत्रण. पण मागच्या पवसाळ्यात ढग असे आले आणि पाऊस इतका पडला की तो पावसाच्या प्रेमातच पडला. पाऊस आधीही पडायचा, कदाचित असाच, इतकाच किंवा जास्त ही. पण या वेळेस मात्र पाऊस एकटा आला नाही, त्याच्या आयुष्यात सोबत घेऊन आला तिच्या केसांचा ओला सुगंध. ती अशीच त्याला भेटली, अगदी अचानक आलेल्या मुंबईतल्या पावसासारखी, चिंब भिजलेली. त्याला ती आवडली आणि म्हणून पाऊस ही. ती त्याला पुन्हा भेटली, न ठरवून, अशीच पुन्हा एकदा अचानक पावसाराखीच. ते बोलले, थांबले, विसावले. ती समोर आली तेंव्हा पाऊस नव्हताच, ती अजून थोडी जवळ आली तेंव्हा ही पाऊस नव्हता. तो तिच्याकडे सारखा पहातच होता, पण नजर चोरून. आयुष्यात पहिल्यांदा त्याने पावसाकडे येण्याची विनवणी केली. आशेच्या नजरेने त्याने ढगांकडे पाहिले. ढग होते, पण अजून पाऊस मात्र नव्हता. तरी ही आजूबाजूंच्या झाडात, डोंगरात, फुलात आणि पाखरात ओलावा होताच. त्याच्या विनवनीने अखेर तो आला. रिम-झिम, रिम-झिम. दोघेही एका छोट्या झुडपाखाली उभी. एकचजण मावेल इतकच छोट झुडूप. ती अजून थोडी आडोश्याला सरकली, भिजू नये म्हणून. हा मात्र भिजत तसाच उभा, तिच्या ओल्या सौंदर्याकडे पाहत. तो ओला होत होता, भिजत होता. तिला काळजी वाटली. धाडस करूनच म्हणाली, अलीकडे ये भिजतोयेस तू. पावसाने भिजलेला तो, तीच्या शब्दांनी खऱ्या अर्थाने ओला चिंब झाला. आज पहिल्यांदा चिंब भिजण्यात इतका आनंद असतो हे त्याला उमजलं. तिच ऐकून हा थोडा पुढे झाला. आता मात्र त्याला पाहून ती खूप लाजली, मनातल्या मनात पुटपुटली 'भित्रा कुठला'. तिच्या जवळ गेलेला तो थरथरत होता, तिच्या अंगाला स्पर्श होऊ नये म्हणून अंग चोरून उभा. तो तसा अंगाचोरून उभा राहिलेला पाहून तिनेच पुन्हा खूप खूप धाडस केलं, त्याच्या हाताला घट्ट पकडल आणि काही तरी पुटपुटली. त्याने ते ऐकल. तो ही काही तरी पुटपुटला. आता मात्र पाऊस धो धो बरसत होता. तो तसाच बरसत राहिला.

आज सकाळी तसेच ढग आले, तसाच पाऊस आला. तो थोडा भिजला. छत्री उघडावी अस खूप वाटल त्याला. पण तोवर आठवणींचे ढग कोसळेले होते आणि दाटलेला कंठ बांध सोडून वाहत होता. तो पुन्हा चिंब भिजला होता, पावसात आणि पुरात. ......... प्र. बा.

Monday, July 26, 2010

तू तिथे मी.....

तू दिवस मी रात
तू समई मी वात

तू नदी मी नाला
तू वेली मी पाला

तू फुल मी काटा
तू झाड मी फाटा

तू बदाम मी काजू
तू नागर मी जू

तू गाय मी रेड्या
तू जेल मी बेड्या

तू पाऊउस मी वारा
तू धबधबा मी झरा

तू डोंगर मी दरी
तू ढग मी सरी

तू दुध मी साय
तू गुढघा मी पाय

तू झोप मी स्वप्न
तू लोणी मी कृष्ण

तू सवाल मी जबाब
तू हड्डी मी कबाब

तू कापूस मी सुत
तू समाचार मी दूत

तू आग मी वणवा
तू दिवा मी काजवा

तू घन्टा मी नाद
तू चव मी स्वाद

तू सूर्य मी किरण
तू जंगल मी कुरण

तू देव मी देव्हारा
तू पिचकारी मी फवारा

तू चंद्र मी रवी

तूच माझी कविता मी तुझा कवी .................
--कांबळे परमेश्वरनोट : कविता माझ्या परवानगीने कोणीहि , कुठेहि पब्लिश आणि पब्लिक करू शकतो .

Wednesday, April 28, 2010

तुझाच हात हाती हवा


कानावर बोल पडता तिचे
ती काळजाला स्पर्श करते,
मंद- गोड हसण्याने तिच्या
मग दोघांचेही भान हरवते

शब्दांनीच बोलावं असं काही नसते,
बोलण्यासाठी भावना ती महत्वाची असते !
तिची ती भावना, माझ्या मनाला कळते,
अन माझ्या प्रीतीने तिचे हि मन शहारते !

खळखळून हसणारी, माझी ती हसरी,
स्वप्नात देखील हसताना दिसते ..
तिचे ते हास्य टिकवण्यासाठी,
माझे हि मन मग रात्रं-दिवस एक करते !

हसता हसता कधी डोळे ओले हि होतात
काळजीने एकमेकांच्या
हळूच आसू बाहेर पडतात,
शब्द तिचे बाणासारखे ,
काळजावरती घाव करतात ..
अन जखम करून माझ्या मनाला,
शेवटी स्वतःच त्याचे दुख भोगतात

तिचे ते दुख,
मी नाही बघू शकणार
तिच्या प्रत्येक सुखासाठी
जीवाचा माझ्या रान करणार

सुखाच्या प्रत्येक स्वप्नासाठी
सये .. देशील ना ग साथ ,
साकारण्यासाठी ते प्रत्येक स्वप्न
फ़क़्त हाती हवा तुझाच हात !.. तुझाच हात ..

- अमोल, २८ एप्रिल २००९Monday, April 26, 2010

वाट मी पाहतो आहे


डोळ्यात तिच्या मी पहिले
अन क्षणात सारे बहरून गेले !
अंतर जरी पडले, तरी
मन मात्र एकमेकात कायमचे गुंतून पडले !

डोळ्यांची भाषा डोळ्यांनाच का कळते
बोल पडले कमी तरी
अंगात प्रेमाची एक लहर सळसळते

कधी कधी बोलतांना
केवळ एक नजर पुरेशी असते
अन बोलायला सुरु केला
तर अक्खी रात्र पण अपुरी पडते

हे असे का होते ?
हे असे का घडते ?
स्वप्न पाहण्या साठी सखे
झोप तरी कुठे ग येते ..

स्वप्नात पहिले जे
प्रत्यक्षात मी अनुभवतो आहे !
तिच्या आठवणींच्या सवे,
फ़क़्त तिच्याच येण्याची वाट मी पाहतो आहे !

वाट मी पाहतो आहे .........
-- अमोल

क्षणात सारे बदलून गेले


क्षणात सारे बदलून गेले,
तिला पहिले अन-मन माझे हरवून गेले.

अशाच एका सायंकाळी
तिची आणि माझी पहिली भेट,
सोबतीला होता केवळ एकांत,
अन नजरेला भिडली नजर थेट.

भिर-भिरणारे मन माझे हे
झाले अगदी निवांत,
कशी असेल ती ? कोण असेल ती ?
ह्या प्रश्नाचे काहूर हि झाले शांत

लागताच चाहूल सुखाची मनाला
नवी पालवी जणू मनात फुटली,
जशी सुखाची भाग्य लक्ष्मी- तिच्या पावली जीवनात आली.


स्वप्न नवे .. नवे हे जीवन
सोबत नवी .. नव- नवी हि आठवण,
आयुष्यात कायम राहो
असेच आमच्या सुखाचे हे सोनेरी क्षण !

- अमोल

Thursday, January 14, 2010

पर्व संक्रांतीचे तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शुभ पर्व आहे हा संक्रान्तिचा
स्नान करा , घ्या संकल्प नवा
तन आणि मन आपण शुद्ध करा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

आता सूर्य आला उत्तर मध्ये
आणि प्रकाश जीवनात तुमच्या
द्या सर्वाना सन्देश आज मैत्रीचा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

भीष्माने त्यागला होता आपला देह
आजच्याच दिवशी, गंगा आली पृथ्वीवर !
असा हा संक्रान्तिचा आहे महिमा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !

कुठे आहे लोहड़ी , ते कुठे उत्तरायणी
कुठे पर्व पोंगल्च्या आणि कुठे बिहूचा
माझ्या राष्ट्रामध्ये अनेकते मध्ये एकता
हे पर्व संक्रांतीचे तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
तीळ गुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला !

------- निपुण पाण्डेय "अपूर्ण "

****मी मराठी शिकत आहे ! चूक दिसल्यास क्षमा असावी !
विशेष आभार : श्री अमोल सुरोशे ( मराठी मार्गदर्शन साठी )

केवळ जन्माने अमराठी असला तरी माझ्या या मित्राच्या भावना ह्या अस्सल मराठी आहेत .. धन्यवाद निपुण पाण्डेय

Thursday, September 17, 2009

"स्वराज्याचे तोरण"

"स्वराज्याचे तोरण"


Created on : Year 2003
Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : Its about “Chatrapati Shivaji Raje Bhosale”.He had created Maratha kingdom , “Hindavi Swarajya” i.e Maharashtra by defeating Mughal , Vijapurkar , British. This poem will tell you about how he united all maratha youth and how he won his first war at age of only 16 year .. !!!
जुलमी काळोखा त्या मिटवाया
मराठ्याने सिंह मागीला ,
भवानी कृपे जिजाउ पोटी
कारने शीवाबा अवतरला ...

जिजाउ शिकवणी शीवाबा मनी राम कोरीला
दादोजीने त्यात रांगडा योद्धा घडविला ,
मराठ्यांचा भगवा इतिहास ज्याने लिहिला ...

वय सोळव्या राज वैभव सोडूनि
शिवाने एक एक मावळा जोडीला ,
तलवार हाती घेऊनी , रायरेश्‍वरा शपथ खाऊनि
स्वराज्या मनसुबा आखिला ...


गरा गरा फिरवूनि पट्ट्याला
मराठ्याने शत्रू धरणी पाडिला ,
साखळ्या जखडूणी किलेदारला
तोरण्या भगवा फडकविला ...

मोरारजी बेफाम जाहाले पूरंधराला
बाजीप्रभू लढले पावन खिंडीला ,
तानाजी जिद्दीने चढले कोंढण्याला
खुद्द शिवाजीच भिडले सुरतेला ...


एक एक मावळा शर्थिने लढत होता ,
वेळ प्रसंगी प्राणांची आहूत देत
स्वराज्याचा भगवा सह्याद्रीवर फडकवीत होता ..


बड्या गुर्मित शाहिष्त्या खान आला
पुण्यात बोटे गमावून गेला ,
जो म्हणे पकडून आनीतो शिवाजीला
कोथळा धरून लोळवे लागले त्या अफझल्याला ...


मुघल भ्याले ,पळविले नवाबा
आसा गाडी शूर शिवबा ,
स्थापुणी हिंदवी स्वराज्या
हिंदूह्रदयि मान मिळविला !!- By Shyam Wadhekar

पाखरू

पाखरू


Written in : 2004
Written By : Shyam Wadhekar

Language : Marathi
Description : Its about love. What does mean by true love ? If you like some one truly then don’t think that she should also like you. You have to see life through her eye , think what she like and what she want ? ..Then only she will be happy and ..of course you too. "कुणी आवडल म्हणून ते मिळयलाच हव अस नसत ... तिला काय पाहिजे हेच मला पहाव लागत ...... "काल एक पाखरू
रानात त्याच घरट शोधताना मी पाहील ,
कसा सांगू त्याला
त्याच घरट पडताना मीच पाहील ...


प्रेमाने सारे आपलेसे वाटतात
आविश्वासने मात्र सारे क्षीतिज्या प्रमाणे वाटतात ......

मागाताना सारे
स्वता साठी काही तरी मागतात ,
मिळयच नसत ते
मग स्वप्न तरी का बर दिसतात .....


मला मिळाल नाही
कारण स्वप्न फक्त एकच उरल होत ,
का कुणाच टाउक पण त्या वरही
आंदुकस नाव तुझच कोरल होत .....कुणा तरी एकालाच मिळनार
त्याच्याच चेहरायावर हास्य फुलनार ,
शेवटच म्हणून तुझ्याच चेहरायावर हास्य मला पाहाचय
हेच मी तिथ मागीतल होत.....!!!!!


-Shyam Wadhekar

यादे

यादे


Created By : Shyam Wadhekar
Language : Hindi
Description : Its about memories of those sweet people , who were in my life for very short period of time.But are still having place in my heart …… and will be always there !!फुलो से दिन
वो चंद मुलाक़ाते ,
हसता मुस्कुराता देख आपको
गुजरती थी वो राते !!

नज़ारो का नज़ारो से मिलना
देख अन देख आपका मुस्कुराना !
लगे जैसे सागर की लहरो का
किनारों से मिलना !!

बीती यादे याद कर डरता है दिल
नज़र आपसे मिलाके मुखरता है दिल !
ना जाने फिर भी क्यू
प्यार आप से ही करता है दिल !!

सोचा अब बता ही दू
दिले हाल सुना ही दू !
सागर की प्यासी लहरो को
किनारो से मिला ही दू !!

पर दिल की बात
जूबा पे न ला सका !
झिलमिलाती आपकी आँखो मे
जवाब भी न पढ़ सका !!

" कभी कभी भगवान जी किसी का साथ बहुत कम समय का लिख देते है .. पर वो पल , वो लोग हमेशा के लिए दिल मे बस जाते है ... ..इसलिए..
"

जब भी आपको सोचा
आँखो को बंद किया
!
बीती यादो के दरमिया
हमेशा आपको दिल के करीब पाया !!

By : Shyam Wadhekar