Tuesday, December 18, 2007

sakhi

शोधून कुठे सापडणार नाहीस
काळजात ठसलीस आता जाणार नाहीस
प्रेमात पडलो मी तुझ्या कायमचा
प्रेयसी नाहीस पण आहेस तू माझी सखी

शैली तुझी सुंदर अन स्वरूप
वेडा झालो पाहून तुझा हुरुप
विचार तुझे शांत नि कोमल
आहेत तितकेच अचूक आणि प्रबल

कोण आहेस तू जरा सांगशील का ...
कोणी ही असलीस तरी आहेस माझी सखी

जग धावते मी धावतो सगळेच धावतात
पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवते
कधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगते
ती दुसरी कोणीच नाही आहे माझी सखी

तू माझी नाही होऊ शकत
पण आहेस माझी सखी
प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्ये
प्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझी सखी

सर्व काही विसरून आपले सर्व देणारी तू
प्रत्येकासाठी स्वत:ला विसरून समजून घेणारी तू
तुला कोणी समजले नाही पण मी तुला समजलो
जगात तुझ्यासारखी कोणीच नाही कारण तू आहेस माझी सखी

Best one

सावल्यांमधून दिसते हळूच हसते
गोंडस दिसते सुंदर दिसते
तिची ती ओळख असते निराळी
दु:खात सुद्धा हसते ती एक पंख नसलेली परी

सगळ्यांपेक्षा असते ती अलग
तिच्या भावना ना कोणी समजून घेत ना तिला समजून घेत
पण ती असते वेडी त्याच भावनांची
कोणासाठी पण आपले सर्वस्व देईल अशी असते ती पंख नसलेली परी

दु:ख तीची तीच गिळते
सौंदर्यात विलिन होऊन सर्व काही विसरते
प्रत्येकाच्या जखमांवर आपल्या भावनांचे मलम लावते
त्यांच्याच विचारात जणू हरवून जाते ती पंख नसलेली परी

कधी तिच्यासाठी पण येईल एक राजकुमार
बाहूंमध्ये त्याच्या धरून तो तिला घेऊन जाईल
त्याच्या राजमहालात असतील ते फक्त दोघे
पण पिंजय्रातच का पुन्हा जाई जणू ती पंख नसलेली परी

Friday, December 14, 2007

Jadu Marathi Kavitechi...!

लाजून चूर झाली
हलकेच दूर झाली
ओठांस ओठ भिडले
गलती हुजूर झाली
लटकाच राग आला
जादू जरूर झाली
मुरालीत शीळ जाता
ती सप्त सूर झाली
पडलो रणात आम्ही
हृदये फितूर झाली
मी बादशाह झालो
ती कोहिनूर झाली

Wednesday, December 12, 2007

Nice one...

नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचे
हे घाव अंतरीचे असतात झेलण्याचे

खोली कशी कळावी सांगून कोरड्यांना
असतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे

होऊ नकोस मुग्धा ऐकून गीत माझे
कविता निमित्त आहे संवाद साधण्याचे

जळणे कठीण नसते ज्योतीवरी, पतंगा
असतात प्रश्न अवघड नाते निभावण्याचे

नाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान अंतर दोघात राखण्याचे

चुपचाप तेवणारी ज्योतीच दु:ख जाणे
दिनरात प्रियकरांना बाहूत जाळण्याचे

Friday, December 7, 2007

Prem Katha....

वसंताच्या साक्षीने बहरुन तो बाहेर आला...
नव्या मित्रांच्या साथीने नवी दुनिया निहारु लागला...
कळत-न-कळत एके दिवशी, त्याचे तिच्याकडे लक्ष्य गेले....
आणि त्यालाही कळले नाही, कधी त्याचे अस्तित्व तिच्यात सामावुन गेले....

ती त्याच्याकडे बघुन, गालात खुदकन हसली...
आणि ते पाहुन आनंदाने, त्याने एक गिरकी घेतली....
हळू-हळू ही कुज-बुज सगळीकडे पसरली...
राजाच्या गुलाम तिच्या बापाने, त्याला इन्द्रछडीही दाखवली....

तरी कधी नाही त्याने, उफ़्फ़ ना आह: केली...
अश्रूंचेही मोती बनवुन, त्याने तिला वाहिली...
दिवस गेले आणि रात्र सुद्धा सरली...
मिलनाची स्वप्ने त्याची, वारयावरच तरळली...

तिच्या प्रेमापायी त्याने, तारुण्याचा त्याग केला...
निरोपाची वेळ आली, हे ग्रीष्म त्याला सांगून गेला...
मरतांनाही तो म्हणाला, जीवन माझे कृतार्थ झाले....
जिवंतपणी नाही, पण मेल्यावर तरी तिने मला जवळ घेतले......

close to my heart

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.

Maitree.. Tuzi aani Mazi

तुझं माझं मैत्र...
जीवनाच्या कागदावर रेखाटलेले एक चित्र...

भरलेले विविध भावनांचे रंग..
नारंगी बालपणातल्या मस्तीत दंग..

तो हळुवार रंगलेला हिरवा..
जणु सोबतीच्या आठवणीतला गारवा...

लाल लाल तारुण्यातला जोश...
तर प्रेमळ क्षणातला गुलाबी मदहोश....

ह्या छटा अनेक रेखाटलेल्या...
कधी रुसलेल्या कधी हसलेल्या...

गडद दु:खातल्या आधारासारखं...
तर सुखातल्या क्षणापरी हलकं...

सरळ आडव्या रेखांनी हे सांधलेलं...
अन वेग-वेगळ्या घटनांनी बांधलेलं...

तुझं माझं हे मैत्र...
एक नयन-रम्य चित्र....
विस्तारु याला अजून मोठं
राहून नेहमी एकत्र....

Wednesday, December 5, 2007

Tuzyach hatat ahe ga sagal...

तुझ्याच हातात आहे सगळ

मी पाहिले तुला ,
हसलो तुझ्याकडे पाहून,
तुही हसायचे की नाही....
तुझ्याच हातात आहे सगळ...

आपण भेटलो ... बोललो .... ओळख वाढली,
नोकरी साठी अर्ज करतात ना ....
तसा मैत्रीसाठी मी हाथ पुढे केलाय ....
मिळवायचा की नाही...
तुझ्याच हातात आहे सगळ

आपलं भेटन आता रोजचं झालंय,
आपलं एकत्र असण आता नेहमीचं झालंय,
तू रोज भेटली पहिजेस हे माझ्या गरजेचं झालंय....
आज पूर्ण दिवस एकत्र होतो ........
उदया भेटायचे की नाही .....
तुझ्याच हातात आहे सगळ

तूच माझी सर्व काही ....
सूर ...लय ....कवितांचा आशय ....
तुझ्याशिवाय मरने ही आता अशक्य झालय .....
मी मरायचे की नाही ...
तुझ्याच हातात आहे सगळ

तू म्हणतेस माझ्या बोरोबर मरायलाही तयार आहेस...
तू म्हणतेस माझ्या बोरोबर मरायलाही तयार आहेस...
पण ...
तिथेच थोडी चुक्तेस
कारण
माझ्या बरोबर मरायलातर कुणीही तयार होईल ग ...
माझ्या बरोबर मरायलातर कुणीही तयार होईल ग ...
जगायलाच कुणी तयार नाही
मी जगायचे की नाही ....
तुझ्याच हातात आहे सगळ

दूसरे काय होणार होते मी मेल्यावर?
दूसरे काय होणार होते मी मेल्यावर?
चांगला होता बिचारा ...
सुटला एकदाचा ...
हेच ऐकतोय केव्हापसून .....
अजुन तरी एकालाही रडतान्ना पाहिले नाही ......
एकाने तरी रडायचे की नाही......
तुझ्याच हातात आहे सगळ
तुझ्याच हातात आहे सगळ
तुझ्याच हातात आहे सगळ

tila he kadhi samjatach nahi ..

पण तिला हे समजत नाही...
पण तिला हे समजत नाही...

कधीतरी...
उगाच वाटतं...
प्रेम केलंच नसतं तिचावर तर...
तर... किती बरं झालं असतं ना!
फोन करण्याची गरज नाही...
म्हणजे पैसे वाचणार...
महिन्यातल्या ५-६ बिअर वाढणार!
डोक्यामागे कटकट नाही...
सारखं सारखं ऑनलाइन यायची गरज नाही...
म्हणजे पैसे वाचणार...
महिन्याला ४-५ सिगरेटची पाकीटं जास्त येणार!
तिला भेटावं लागणार नाही...
त्यामुळे हॉटेलींग कमी होणार...
म्हणजे पैसे वाचणार...
बाहेरच्या खाण्याचे वांधे नाही होणार!

पण हे खरंच असं असतं का?
तिच्याशिवाय रहायला जमतं का?
बियर, सिगरेटला तिच्या एवढा गोडवा आहे का?
नाहीच!

उलट, तिच्यासाठी आपण सगळी व्यसनं सोडतो...
दिवसभर तिच्याच विचारांमध्ये गढतो...
तिचा आवाज ऐकण्यासाठी तडफडतो...
तिला भेटण्यासाठी जग उलटं करतो...

म्हणूनच, आपण तिच्यावर प्रेम करायचं सोडत नाही...
पण ही गोष्ट मात्र तिला, कधीच समजत नाही...

Tuesday, December 4, 2007

jass chya tass .. rahil ka sar

जस्स च्या तस्स.............!!!!!!!
जस्स
च्या तस्स.............!!!!!!!

जस्स
च्या तस्स राहील का सारं....?

हाक
नुसती ऐकून थांबेल का वारं.......??

धपाट्याबरोबर
मिळतील का आईच्या हातचे पोहे

रीझल्टवरच्या
सहीसह बाबांचा प्रश्न ....काय हे?

सहलीच्या
आदल्या दिवशी उडालेली झोप,

आजीबरोबर
लावलेले पहिले-वहिले रोप,



ती
दिड रुपया भाड्याची सायकल,

ब्रेकडांस
मूनवॉक करनारा तो मायकल...

पुन्हा
खांद्यावर दिसेल का ती शाळेची बॅग....?

अणि
मानेला रुतेल का नव्या शर्टचा टॅग....?



आवडती
छ्त्री हरवेल का परत..?

मोडतील
का बेत आल्यावर ठरत..?

शाळेतली
मैत्रीण परत मारेल का हाक..?

मिळेल
का कधी खिडकीजवळचा बाक...?



ऐन
सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट..?

आउट
झालो कारण चांगली नव्हती बॅट..?

होईल
का टिव्ही - "ब्लॅक ऍन्ड व्हाईट" चा "कलर"..?

पाहिल्यावर
एकदम चोरेल का ती नजर...??



"Ice-cream"
ची टिंग-टिंग ऐकून पळतील का पोरं...?

मधल्या
सुट्टीत खायला मिळतील का बोरं..?



जस्स
च्या तस्स राहील का सारं....?

हाक
नुसती ऐकून थांबेल का वारं..?

>>>>>>>>>>>>>>>>!<<<<<<<<<<<<<<<<<<<<

जस्स
च्या तस्स काहि राहत नाही,

थांबवायला
गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि.

धपाटा
मारण्यासाठी का होईना पण वाटत की,

आई
जवळ हवी होती,

अणि
दरवाज्यातल्या मोटारी पेक्शा

जुनी
सायकलच बरी होती,

आदिदास
असो वा रामदास असो आजीच्या हातच्या लोणच्यापुढे,

सार
काही दास आहे

त्याचीच
आठवण येऊन आज

मन
मात्र उदास आहे

आठवणीच्या
ह्या सावल्यांकडे मी आजकाल पाहत नाही,

थांबवायला
गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि.

पुर्वि
छ्त्री हरवली होती, आता छत्र ही हरवलं आहे,

प्रियेसिला
लिहीलेलं पहिलंवहिलं पत्र हि हरवलं आहे,

पावसाच्या
प्रत्येक थेंबाप्रमाणे,

तीची
छबी नवी होती,

नजर
चुकवण्यासाठी का होईना.....

पण
ती जवळ हवी होती.

एरवी
मुसळधार पावसात चिंब भिजणारा मी

आज
पावसाच्या वाटेलाही जात नाही......

थांबवायला
गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाहि

Romantic ........ prem

आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !

म्हणूनच ......
आज तुला जे काही बोलायचंय ते सारं बोलशील का ?
स्वतःला विसरून फक्त माझ्या डोळ्यांमधे हरवशील का ?

हातात हात घेऊन मनातील सारे भाव सांगशील का ?
गुपित तुझ्या ह्रुदयातील सांग ना उलगडशील का ?

सर्व दुःख यातना विसरून मनापासून हसशील का ?
झुगारून सारी बंधनं फक्त माझीच होऊन राहशील का ?

कारण .......
आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !!!