वसंताच्या साक्षीने बहरुन तो बाहेर आला...
नव्या मित्रांच्या साथीने नवी दुनिया निहारु लागला...
कळत-न-कळत एके दिवशी, त्याचे तिच्याकडे लक्ष्य गेले....
आणि त्यालाही कळले नाही, कधी त्याचे अस्तित्व तिच्यात सामावुन गेले....
ती त्याच्याकडे बघुन, गालात खुदकन हसली...
आणि ते पाहुन आनंदाने, त्याने एक गिरकी घेतली....
हळू-हळू ही कुज-बुज सगळीकडे पसरली...
राजाच्या गुलाम तिच्या बापाने, त्याला इन्द्रछडीही दाखवली....
तरी कधी नाही त्याने, उफ़्फ़ ना आह: केली...
अश्रूंचेही मोती बनवुन, त्याने तिला वाहिली...
दिवस गेले आणि रात्र सुद्धा सरली...
मिलनाची स्वप्ने त्याची, वारयावरच तरळली...
तिच्या प्रेमापायी त्याने, तारुण्याचा त्याग केला...
निरोपाची वेळ आली, हे ग्रीष्म त्याला सांगून गेला...
मरतांनाही तो म्हणाला, जीवन माझे कृतार्थ झाले....
जिवंतपणी नाही, पण मेल्यावर तरी तिने मला जवळ घेतले......
No comments:
Post a Comment