तुझ्याच हातात आहे सगळ
मी पाहिले तुला ,
हसलो तुझ्याकडे पाहून,
तुही हसायचे की नाही....
तुझ्याच हातात आहे सगळ...
आपण भेटलो ... बोललो .... ओळख वाढली,
नोकरी साठी अर्ज करतात ना ....
तसा मैत्रीसाठी मी हाथ पुढे केलाय ....
मिळवायचा की नाही...
तुझ्याच हातात आहे सगळ
आपलं भेटन आता रोजचं झालंय,
आपलं एकत्र असण आता नेहमीचं झालंय,
तू रोज भेटली पहिजेस हे माझ्या गरजेचं झालंय....
आज पूर्ण दिवस एकत्र होतो ........
उदया भेटायचे की नाही .....
तुझ्याच हातात आहे सगळ
तूच माझी सर्व काही ....
सूर ...लय ....कवितांचा आशय ....
तुझ्याशिवाय मरने ही आता अशक्य झालय .....
मी मरायचे की नाही ...
तुझ्याच हातात आहे सगळ
तू म्हणतेस माझ्या बोरोबर मरायलाही तयार आहेस...
तू म्हणतेस माझ्या बोरोबर मरायलाही तयार आहेस...
पण ...
तिथेच थोडी चुक्तेस
कारण
माझ्या बरोबर मरायलातर कुणीही तयार होईल ग ...
माझ्या बरोबर मरायलातर कुणीही तयार होईल ग ...
जगायलाच कुणी तयार नाही
मी जगायचे की नाही ....
तुझ्याच हातात आहे सगळ
दूसरे काय होणार होते मी मेल्यावर?
दूसरे काय होणार होते मी मेल्यावर?
चांगला होता बिचारा ...
सुटला एकदाचा ...
हेच ऐकतोय केव्हापसून .....
अजुन तरी एकालाही रडतान्ना पाहिले नाही ......
एकाने तरी रडायचे की नाही......
तुझ्याच हातात आहे सगळ
तुझ्याच हातात आहे सगळ
तुझ्याच हातात आहे सगळ
No comments:
Post a Comment