Thursday, January 10, 2008

Baliraja ....


शाळेत शिकलो होतो
भारत कृषी प्रधान देश आहे म्हणून
पण तेव्हा देत नव्हते
कुणी शेतकरी जीव
आताही तेच ऐकतोय
भारत कृषी प्रधान देश आहे
पण आता इथं
शेतकरी संपवतात
आपलं जीवन...
त्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या
तुम्ही वाचता आणि
फक्त हळहळता...
कुणी म्हणतं त्यांना
शेतीच करता येत नाही
पण
पोट कसं भरतयं तुमचं
हेच विसरतात..
शेतकऱ्यांच्या पिढ्या
खपल्या शेतात
तिथं करता येत नाही
चार पैशांचा भ्रष्टाचार
कुणी देत नाही तिथं
एक-दोन पोते लाच
जमिनीत पेराव लागतं
अन्
पहावं लागतं आभाळाकडं
पाऊस तुमच्यासाठी
असतो वैताग
आमच्यासाठी असतो
जगण्याचं अमृत
आणि काय केलत हो तुम्ही
आमच्यासाठी कधीतरी
दोन तासांचं लोडशेडिंग
तुम्हाला अस्वस्थ करणारं
पण पंधरा-पंधरा दिवस
लाईट नाही
विहिरीत पाणी पण...
पिकं जळतात डोळ्यासमोर...
लोडशेडिंग तुम्हाला गैरसोयीचं
तर आमच्यासाठी जीवघेणं
इथं धरणं झाली पण
कालवे नाहीत
भ्रष्टाचारानीच
"पाटा'ला "बंधारे' घातलेत
कसं पोचलं पाणी...
कशी पिकंल शेती...
तुम्ही तरी कसून दाखवा
बटाईनं घ्या
आमची वावरं
बघू मग तुम्ही
केव्हा देणार जीव ते...

No comments: