या पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ मेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची ..
मग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवात तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची.
राजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड.
मग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे.
सर्वांच्या मुखावर एक प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पेक्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचारांनी.
बरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रागांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले...
याच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फाटा लागताच आमच्या गाड्या उजवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फलक लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते.
मग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो.
लगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच.
ते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून .. चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले.
छोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) .
लगेच घाई घाई मध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केली .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची..
राजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात
पण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो.
आमची मोहीम निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढाई .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत.
सुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके .. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच
पुढे झाडा झाडातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हाला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली.
बराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा? पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले.
अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची.
चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. विस्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...
पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखाली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ .
तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते।
पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे। पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता.
पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा.
पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, "राजसदर" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील ..
पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो.
सदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ...
बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते.
एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ...
बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य.
अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले.
हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.
खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ...
वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर.
पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ...
आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो.
मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता ..
"असा ट्रेक होणे नाही " बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे.
सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे ? नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील ..
पुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय
3 comments:
In our daily routine we forget about our tradition and we forget the great heroes who have always been pride for us...
But reading your article everything got refreshed...
Article said it all...
Work is not just life...We need to identify ourselves and think out of the box giving some time from our busy schedule...
Our life has now confined just to "I", "Me", "My family", "my job", "my manager", "my salary", "my house", "My car",....
Just think once is that the only Life??? just give a thought on it for 2-3 minutes ...
Think out of the box and you will enjoy real life...
and yes "I always feel proud to say "I am Marathi"."
Thanks Shweta for your comment;
yes its true that generally people could not think beyond themselves..
Believe me I am also a simple guy like u n all... But when I started thinking beyond me.. I found that world is very different than what i m thinking, When I touched with thoughts of our historical personalities I m feeling very proud that I belongs to those people who have sacrifice their life for other people..
If people like u n me started thinking about our Culture .. Our glorious history and about the bright future of our Nation definitely We can Make the Difference.
I appreciate your feelings..
I reqeust you please read more.. read gud articles you will realize the change in urself.. Please go through my other blogs and Please contribute also.
http://mukhyamantri.blogspot.com/
Also We have started very noble activity, So I reqest Plz Visit
www.jijau.com also.
Thanks n Keep in touch.
अगदी बरोबर! आपण आयुष्याचा विचार कधी कधी चाकोरीतून करतो [पहा डोंबिवली फास्ट सीन, त्यात खूप छान दाखवलाय हे]. "मी" आणि "माझं" यात गराड्यात जे माझ्या अन्तर मनाचं असतना ते हरवूनच जात; नव्हे गर्दीत आपणच ते मुद्दामहून विसरतो, कारण कदाचित मोठे झालोये या भीतीत हे आता शोभणार नाही अस वाटत राहत. कारण मी बर्याच लोकांना बोललो तेन्ह्वा प्रत्येकाचे एक म्हणणे -"अरे शाळेत असताना मी खूप छान लिहायचो, वाटायचा हे जग बदलून टाकावं, हे करावं आणि ते करावं, फिरायल आवडायच, गायला आवडायच, बोलायला आवडयच, खूप इच्छा होत्या असा जगेल की हेवा वाटावा जगाला....वगैरे वगैरे... !". मग मी विचारतो "आता काय झाल?". तो: "माहित नाही काय झाला पण सगळ सुटल!". हे "माहित नाही काय झाल" हेच मुळी आपल चुकतंय. बघाना काय झाले ते, आणि घ्या स्टेप्स ते सुधारण्यासाठी. नसता असच जगू आणि पटकन मरून जाऊत एक दिवस, कळणार ही नाही काय झालं ते. मनापासून जगायचं असेल तर खरच वेळ फार कमी आहे, आणि जगासारखा जगायचं असेल तर वेळ खूप आहे [त्यामुळेच तर आपण म्हणतोना फार बोर होतेय, दिवस कटतच नाही!]. हव तस जगा ...... जग पुन्हा सुंदर बनवण्यासाठी जगा.... बघा आपल मन कस लहान बाळासारखे खुदुखुदू हसते की नाही ते !
[कोणत्या ही वाक्याला सल्ला म्हणून घेऊ नये! हे माझे व्यक्तिगत विचार आहेत ;-)]
माझच एक वाक्य [;-)] : आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो !!!!
जय महाराष्ट्र!
Post a Comment