Wednesday, July 15, 2009

मोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड

या पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ मेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची ..

मग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवा
त तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची.

राजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड.

मग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे.

सर्वांच्या मुखावर एक प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पे
क्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचारांनी.

बरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रा
गांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले...

याच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फाटा लागताच आमच्या गाड्या उ
जवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फलक लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते.

मग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो.

लगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच.

ते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून .. चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले.


छोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) .

लगेच घाई घाई मध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केली .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची..

राजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात

पण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो.

आमची मोही
म निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढाई .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत.

सुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके
.. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच

पुढे झाडा झाडातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हा
ला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली.

बराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा? पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले.

अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची.

चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. वि
स्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...

पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखा
ली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ .
तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते।

पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे। पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता.

पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा.

पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, "राजसदर" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील ..
पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी
आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो.

सदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ...

बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते.

एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ...

बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य.

अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले.

हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.

खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ...

वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर.

पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ...

आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो.

मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता ..

"असा ट्रेक होणे नाही " बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे.

सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे ? नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील ..

पुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय




Wednesday, July 8, 2009

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा...

Tuesday, June 30, 2009

जिजाऊ .कॉम - मनोगत


जिजाऊ .कॉम - मनोगत

महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृपे करुण आज तो सोनियाचा क्षण माझ्या जीवनात आला, तमाम मराठी माणसाचे आराध्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेव यांच्या पावन विचारांचा स्पर्ष माझ्या जीवनाला झाला

केवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत तथा या विश्वातील मातृत्व ला आदर्श म्हणजे जिजाऊ माँ साहेब

साडे-तीनशे वर्ष यवनांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही माय भूमि, हिन् पशु यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख , स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखा बुडालेली आमची जनता, आपली निष्टा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आशी आमची वतनदार जहागीरदार यांची जमात

आशा कठिन समयी जाधावांची कन्या , शहाजी राजांच्या नावाने सौभाग्याच लेनं लावणारी जिजाऊ आपल्या डोळ्यात फक्त एकाच स्वप्न बघत होती... होय स्वराज्याच ते देखन स्वप्न !

ज्या काळामधें ना देवांच्या वर, ना धर्मावर, ना ही आपल्या बायका पोरांवर सुद्धा आपला हक्का सांगण्याची हिम्मत कोना मधे उरली होती तेंव्हा त्या माउलिने स्वंतंत्र, स्वाभिमानी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले

तिच्या डोळ्यातिल ते धगधगते स्वप्न साकारन्या साठी जन्म घेतला तो शिवबाने

माँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले

सर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल

पुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या त्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने

त्या थोर मांऊलिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तिने या मायभूमी मधे सामान्यांचा राज्य प्रस्थापित केल
प्रत्येका मधे शिवाजी- संभाजी घडविला म्हनुनच हे राष्ट्र आगदी खंबीर पनाने सह्याद्रीच्या रुपाने सार्या जगा समोर ताठ मानने उभे राहिले

पन आज याच सह्याद्रिला सुद्धा शरमेने आपली मान खाली घालावी लागत आहे आशा वेळी गरज आहे त्या जिजाऊ माऊली ची तो सह्याद्री आकांत करीत आहे महाराष्ट्र धर्माचा विसर सर्यानाच पडत आहे मग आशावेळी पुन्हा एकदा ते विचारांचे तेज पुंज आपल्या समोर आलेच पाहिजे आज एक शिवाजी अनेक अफजल खानाला मारू शकणार नाही त्या साठी आज प्रत्येका मधे शिवाजी संभाजी घडला पाहिजे आणि ते घडविन्याचि ताकत आहे फक्त जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांमधे

हीच प्रेरणा आणि हच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या भूमि मधे शेतकर्यांचे, कष्टकर्याचें आणि सामन्यांचे सुराज्य घडवायचे आहे
या थोर उद्देशानेच आम्ही मांड्लेला हा प्रपंच www.jijau.com

ह्या वेब साईट च्या माध्यमातून आम्हाला कोणताही नविन इतिहास कोणालाही शिकवायचा नाहीये , पन त्याच इतिहासतुं काय शिकन्या सारखे आहे हे मात्र अगदी ठामं पने सांगायचे आहे

ह्या साईट च्या निर्मितीचे सारे श्रेय मी आज वर ज्यांनी ह्या स्वराज्यबद्दल, जिजाऊ आई साहेबांबद्दल , शिवाजी महाराज तथा शंभू राजांबद्दल लिहून ठेवल आहे मी त्याना देतो आज वर उपलब्ध आसलेले सहित्य ,पुस्तके , सीडी या सर्वान्तुन गोळा केलेली मुठभर माहिती म्हणजे ही वेबसाइट

इतिहास हा नुसता पाठ्य पुस्तकाचा भाग ना राहता त्यातून प्रेरणा घेउन एक नवा इतिहास घडाविने हेच एक उदात्त ध्येय

सर्व लोकाना एकत्र जोडून काही तरी नविन घडविन्याचा प्रयत्न म्हणजे ही वेबसाइट

एक नव्या राष्ट्राचे - महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगुन विचारांची एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे जिजाऊ.कॉम

माला खात्री आहे आपल्या स्वाभिमानाचे हे पेटलेले अग्निकुंड अखंडपने तुम्हा आम्हातिल तो मावळा कायम जिवंत ठेवील

आणि पुन्हा एकदा जिजाउं चे स्वप्न आम्ही मावळें प्रत्यक्षात उतरवून दाखवू

पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या माथ्याला महाराष्ट्र धर्माचा पताका स्वाभिमानाने फडकवुन दाखवू !

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

अमोल सुरोशे (नांदापुरकर)






Sunday, May 31, 2009

Jai jijau!

This is Team jijau.com asking for the information [About jiaju- mother of Shivaji Maharaj] to be put on our site www.jijau.com.

What and Why is www.jijau.com?: Its portal aiming at 1) Information about Masaheb Jijau 2)Rural Education and Development [Probably under the umbrella of jijau.com foundation]
[Because
Ma-saheb Jijau is an undisputed source of inspiration for every one, she was the first lady who dreamt about the "Swarajya", She is the one who gave birth to a great king Shivaji Raje who gave an unforgettable history and many more things to Maharashtra. To make her dream of 'swarajya and surajya for all' true, having movement like this in her name [we think] is an appropriate step! ]

How are we going to do it? : We want the information on jijau to be authentic, unbiased and fact based. We believe in the power of collaboration and democracy. So we won't restrict the content development up to us [The jijau team only], we will call for the content [Stories from life of jijau, articles on jijau and Shivaji raje or Sambhaji raje, Poems, paintings] from every one willing to do so. We will review the content for the correctness by the person who knows the history very well and only then the content will be published [with due credits to the contributor!].
The Rural Education and Development part will cover the government facilities available to the rural areas [some times for the urban too]. It will always have updated information on educational scholarships available to the students [Rural and Urban]. This will be one point global contact for the schemes like donate computer/book/clothes [new]/adopt children for education etc. Our offline team under umbrella jijau.com will do it [Obviously you can also do it in your region, we will happy in seeing you become part of this].
If any money comes from this portal; it will be completely used for the education of the poor [from urban too] and rural children deducting the maintenance of the site [Hosting charges] .We will be happy for working with any NGO wanting to take their work online here at this portal. We wish to have some plans in free health services also. Also we will like to make it a portal of the people who are working individually or in small groups at their regions in similar areas of the rural empowerment [To inspire others in doing the same things in their areas].


What can you do: You can contribute to this site by sending information on life of aau jijau. Information can be:

Part 1]

1)Articles published on jijau
2)Stories about the life of aau jijau
3)Any research work going on the life of jijau
4)Books on aau jijau, contacts of the authors etc.
5)Poems on jijau
6)Paintings on jijau, shivaji raje, sambhaji raje
7)Photos of Forts/Places related to jijau [like shivaneri, sindhakhed, pachad] with some info if any
8)Your thoughts on jijau and the Maharashtra [Just send don't know it may get published]
9)Information of the people who talk, research on life of jijau [Educated or uneducated]
10)Anything that you think will be helpful in inspiring the coming generations

Part 2]

1) Mail us the government schemes (links, info, contacts ) which you think will change the Nation
2)Mail us how some village you know/heard of changed/revolutionized because of some scheme [good if you can write any article, report!]
3) Send us your dreams of revolutionized nation [or state of Maharashtra specially] on social, cultural and economic fronts. [surely we will publish them if well written and appealing]
4) Send us information on scholarships [National, Regional (your local also) ] for rural students
5)Send us info if you want to adopt a student for educating him or offer some scholarship to the deserving candidates [Maharashtra has lot many deserving and deprived children, thanks to all government in last some decades!] (Leave it, we believe in changing it! )
6) Tell if you want to donate some old/new books, computer any educational stationary or clothes or anything that you think will be helpful in some ones education/living [Other people who knew some one who is in need may contact you and get it for them], just email it
7)NGOs may email their work and what they are willing to do new [may help others getting involved with you]
8)Companies working in rural areas [districts/tahasils] can email their requirement, so that youth there gets the information about this may themselves or by some relative/friend visiting the www.jijau.com
9)Please send us stories about how RTI and things like this helped you/your friend
10)Anything that you think should be there on jijau.com

Send it to: team@jijau.com

[For more info visit temporary web portal: www.jijau.com]

- Hide quoted text -

Please send whatever you have related to the above mentioned things- Articles, Painting, Poems, Photographs along with your contact info. The content will be published with your name only. We are trying hard to launch it on 5th June 09 [Shivrajyabhishek din], but its like writing journals for submission on the eleventh hour [ Its not exactly the case; we registered the domain couple of days before!]. So please help us in making this dream come true!

But we may wait further for launching the site with rich contents and catchy look.

Also we like to launch this site with one huge Get together of all such people who are willing to do something for our society.


We request you to be part of this movement and FORWARD this text as an email to other friends!

The major language of web portal will be MARATHI, but we welcome English/Hindi and other languages also!

Jai Jijau!

A Little More:

Who we are: We are a big team of the enthusiastic youths residing at Pune and Mumbai.If any one is curious about how we look, just go on road and pick any group of the youth talking endlessly, teasing each other; we are just like them!


Thanks and Regards!
--

TEAM WWW.JIJAU.COM

||DOING IT THE OPEN SOURCE WAY||

|| For the people by the people ||

Sunday, November 23, 2008

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...


राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...

तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...

तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...

मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...

आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ..
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..

राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...

शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..

राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...

राजे बार झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..
तुमच्या नावासाठी लढताना

Thursday, November 13, 2008

साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं...

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

========================

Sunday, June 29, 2008

श्याम राजेंचा छत्रपति संभाजी महाराजाना एक मानाचा मुजरा ....................




सम्भाजी महाराजांचा इतिहास काही जनानी हेतुपर वाईट रंगवला आहे , हे इतिहासाला
आता पुरत उमगल आहे.

मी कविता लिहिन तसा थाम्बवाला होत , पण त्यांच्या जीवन सम्बंधिच्या वाचनातून आज लिहावासा वाटला आणि आज जवळपास २ वर्षा नंतर लिहायला घेतला ,
जे काही मला कळाले त्याला मी माज्या शब्दात गुफन्याचा प्रयत्न केला उन ..तयार जाली ही कविता....

==================================================================

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!

बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!


डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!

Written By Shyam Wadhekar
Date 29 Jun 08 ,11.40 AM

Wednesday, May 14, 2008

ते सारे क्षण . . .


ते सारे क्षण . . .

ते क्षण . . .
तुझ्या हसण्याचे ,
तुझ्या रूसण्याचे ,
मला चोरून भेटण्याचे . . .

ते क्षण . . .
आपल्या गप्पांचे ,
हातात हात घालून ,
गावभर हीडायाचे . . .

ते क्षण . . .
तुझी वाट पाहण्याचे ,
खोट्या खोट्या भांडनाचे ,
भांडण विसरून पुन्हा हसण्याचे . . .

ते सारे क्षण . . .
आपल्या प्रेमाचे . . .
माझ्या मनाच्या पायवाटेवर ,
आपल्या पाउलखुणा सोडून गेले आहेत . . .
अगदी कायमच्या . . .

त्यानंतर कितीतरी पावसाळे उलटून गेले ,
तरी त्या पाउलखुणा तश्याच आहेत . . .
अगदी तुझ्या आठवणींसारख्या . .

Friday, May 2, 2008

तिला कळतच नाही


तिला कळतच नाही
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.

Sunday, April 20, 2008

नेहमीच कसं हसवायचं...??

नेहमीच कसं हसवायचं...??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं...
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...??

समोरचा तो हसला................नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर...
हसवणाराच् मी कसला...

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं...
दू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं
पण .... श्वास जड होतो जेव्हा---...तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...!!!

मी रडू लागलो जेव्हा ...
ते मात्र हसत होते...
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते...

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत.......स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ........ह्रूदयातच ढग दाटून येतो....तेव्हा रे काय करायचं....???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं.